जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची कार्ये खालीलप्रमाणे असतील :-
- राज्यातील जैन समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे व त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे.
- जैन समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे व त्याची वसूली करणे,
- जैन समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
- जैन समाजासाठी आवश्यक साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
- राज्यातील जैन समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनासाठी अहवाल तयार करणे.
- अतिप्राचीन जैन तीर्थांचे संरक्षण व संवर्धन.
- अतिप्राचीन जैन ग्रंथांचे संरक्षण, संवर्धन व पुर्नलेखन.
- कायम पायी विहार करणाऱ्या जैन साधू संतांच्या विहारसाठी सुरक्षा.
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या जैन विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व शैक्षणिक कर्ज व्यवस्था.
- जैन समाजाच्या विधवा, परित्यक्ता महिलांसाठी विशेष योजना.