वैयक्तिक कर्ज व्याज परतावा रू.१०.०० लक्ष
- शासनाकडून प्राप्त सहाय्यक अनुदान रक्कमेतून महामंडळ ही योजना राबवेल.
- बँकेकडून कर्जमर्यादा रु.१०.०० लक्षपर्यंत असेल.
- बँकेने रुपये १०.०० लाखापर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजुर केलेल्या उमेदवाराने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास, हप्ता भरल्यावर त्यातील व्याजाची रक्कम (१२% च्या मर्यादेत) त्यांच्या आधार लिंक, बैंक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपुर्णपणे संगणकीकृत असुन सदर योजना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली (पीएफएमएस) अथवा तत्सम संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येईल, व्यवसायाच्या स्वरुपानुसार कर्ज रक्कम मंजूर करण्यात येईल.
- कुटूंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल.
- वेबपोर्टल / महामंडळाच्या संगणक प्रणालीवर नाव नोंदणी अनिवार्य,
- कर्ज परतफेडीचा कालावधी बैंक निकषानुसार.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित विभागाशी संपर्क साधा