शासन निर्णय
उपरोक्त विषयाच्या अनुशंगाने शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे:
-
राज्यातील जैन समाज व त्याअंतर्गत येणाऱ्या सर्व पोटजातींच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ व महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ तसेच सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर जैन समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
-
सदर जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे नोंदणीकृत कार्यालय मुंबई येथे राहील. महामंडळाचे मुख्यालय मुंबई येथे व जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा स्तरावरील कामकाज मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयामार्फत पाहण्यात येईल.