प्रस्तावना
जैन समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापनेची मागणी गेली अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधी, विविध संघटनांकडून केली जात आहे. जैन समाज आणि त्यांच्या विविध पोटजाती प्रामुख्याने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेले आहेत. राज्यातील सर्व जिल्यात राहणाऱ्या जैन समाजातील युवकांना वसंतराव नाईक विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, तसेच सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाच्या धर्तीवर विविध योजनांचा (बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना) लाभ मिळवून जैन समाजाच्या सामाजिक विकासासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. या बाबीवर शासन विचार करत आहे आणि जैन समाजासाठी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.